कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर महापालिकेत आघाडी केली आहे. काँग्रेसच्या अश्विन रामाणे यांची महापौरपदी निवड झाल्याने सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.

Updated: Nov 16, 2015, 01:51 PM IST
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे title=

कोल्हापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर महापालिकेत आघाडी केली आहे. काँग्रेसच्या अश्विन रामाणे यांची महापौरपदी निवड झाल्याने सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला २७, राष्ट्रवादीला १५, ताराराणीला १९, भाजपला १३, शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. २ तसेच ३ जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत.  अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा आकडा ४४ वर आला.

सुरूवातीला भाजपला राष्ट्रवादीकडून बाहेरून पाठिंबा मिळेल अशी शक्यता वाटत होती, मात्र राष्ट्रवादीकडून तसा कोणताही प्रतिसाद न दिसल्याने काँग्रेसच्या विजयाची वाट मोकळी झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.