लातूर : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. परवा रात्रीपासून जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरूय.
शनिवारीही जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडला. अहमदपूर तालुक्यातल्या हडोळती-किनगाव परिसराला पावसानं झोडपून काढलं.
अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले, झाडं उन्मळून पडले, विजेचे 15 खांबही पडले. एक वाहनही पलटलं. तर बाबळदरमध्ये विजेचा खांब अंगावर पडून अमृत भूजंग कांबळे या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.