मुंबई : लोकलमध्ये टीसींच्या उद्दामपणाचे दोन प्रकार गेल्या दोन दिवसां घडलेत.
मुंबईतील टिळक नगर स्टेशनवर प्रवाशांकडून अवैधरित्या पैसे मागणाऱ्या टीसींना गुरूवारी प्रवाशांनी चोप दिला. टीसींचं हे टोळकं प्रवाशांकडून केवळ पैसे उकळायचं नाही, तर मारहाणही करायचं. काल त्यांनी एका सीबीआय अधिकाऱ्यावरच हल्ला केला. तेव्हा त्यांना अद्दल घडवण्यासाठी प्रवाशांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
हे प्रकरण ताजं असतानाच, टीसींच्या अत्याचाराचा आणखी एक प्रकार शुक्रवारी घडला. ठाणे ते सानपाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या एका मुलाला दोघा टीसींनी मारहाण केली. हा मुलगा फर्स्ट क्लासचे तिकीट नसतानाही फर्स्ट क्लासमधून प्रवास करत होता. त्यावरून टीसींनी त्याला थेट चोपच दिला. एका प्रेक्षकानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला आणि 'झी २४ तास'कडं पाठवला.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.