नापासांनी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण!

ही बातमी नापासांच्या क्लासची…! इंजिनिअरिंग शिकणाऱ्या अनेकांचा हमखास मॅथ्समध्ये क्लीन बोल्ड होतो… त्यामुळे अनेकांना इंजिनिअरिंग सोडावंही लागत…! पिंपरी चिंचवड मधल्या अभिजित भांडरकर यांना ही मॅथ्समध्ये अपयश आल्यानं इंजिनिअरिंग सोडावं लागले. पण त्यातून खचून न जाता त्यांनी नापासांसाठी क्लास सुरु केलाय. ज्यात मॅथ्यमध्ये नापास झालेल्या मुलांना घवघवीत यश मिळतंय.  

Updated: Jan 16, 2015, 10:10 PM IST
नापासांनी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण! title=

कैलास पुरी, आकुर्डी : ही बातमी नापासांच्या क्लासची…! इंजिनिअरिंग शिकणाऱ्या अनेकांचा हमखास मॅथ्समध्ये क्लीन बोल्ड होतो… त्यामुळे अनेकांना इंजिनिअरिंग सोडावंही लागत…! पिंपरी चिंचवड मधल्या अभिजित भांडरकर यांना ही मॅथ्समध्ये अपयश आल्यानं इंजिनिअरिंग सोडावं लागले. पण त्यातून खचून न जाता त्यांनी नापासांसाठी क्लास सुरु केलाय. ज्यात मॅथ्यमध्ये नापास झालेल्या मुलांना घवघवीत यश मिळतंय.  

अभिजित भांडारकर… भांडारकर सरांचा क्लास जरा वेगळा आहे.... इथे नापास झालेल्या मुलांना शिकवलं जातं. अभिजित भांडारकर यांना ही कल्पना सुचली त्यांच्या ती स्वत:च्याच अपयशातून… अभिजित भांडारकर स्वत: इंजिनिअरिंगला असताना अनेकदा गणित विषयात नापास झाले. शेवटी त्यांनी वैतागून इंजिनिअरिंग सोडलं. एम एस्सी केलं. पण इंजिनिअरिंगमधलं गणितातलं अपयश त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे त्यांनी गणिताची पाठ सोडली नाही.. त्यात आधी स्वतः यश मिळवलं आणि मग गणितातल्या नापास मुलांसाठी क्लास सुरू केला.

भांडारकर सरांच्या क्लासनं अक्षरशः चमत्कार घडवलाय. गेल्या वर्षी इंजिनिअरिंगमध्ये नापास झालेल्या तब्बल १८ विद्यार्थ्यांना या वर्षी १०० पैकी ९० पेक्षा अधिक गुण मिळालेत. तर दोघांना १०० पैकी १०० गुण मिळालेत. आतापर्यंत गेल्या चार वर्षात ६१ जणांना १०० पैकी शंभर गुण मिळविण्यात यश मिळालेय. यंदाच्या वर्षी २७ जणांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.

आलेल्या अपयशातून संधी शोधत यश मिळवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही.. अपयशाने खचून न जाता यशाची शिखरं गाठणारी अनेक जिगरबाज असतात, असेच भांडारकर सर आणि त्यांचे विद्यार्थी त्यांनी हे साध्य केलंय. ते तुम्हालाही एक दिवस नक्की साध्य होईल. गरज आहे ती फक्त प्रयत्नांची…. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.