नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोनं-चांदी देतेय खिशाला ताण, दर पाहून डोक्याला लाव हात!

Gold and silver Prices: तणावपूर्ण वातावरण असल्याने त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर होत आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 10, 2025, 04:40 PM IST
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोनं-चांदी देतेय खिशाला ताण, दर पाहून डोक्याला लाव हात! title=
सोने चांदी दर

Gold and silver Prices: 2024 संपून 2025 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. या नव्या वर्षात अनेक गोष्टी बदललेल्या दिसतायत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडताना दिसतोय. सोने हे त्यातीलच एक. सणासुदीच्या निमित्ताने थोडे थोडके का होईना, सोने खरेदी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तसेच वर्षभरात लग्न, बारसं असे कार्यक्रमही घरघरात येत असतात. या निमित्तानेही सोने खरेदी केली जाते. पण आता नव्या वर्षात सोने खरेदी करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सराफा बाजारात काय सुरु आहे? जाणून घेऊया. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आईने लग्नसराईमध्ये सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.आज जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झालेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बँकांनी सोने खरेदीला सुरुवात केली असून अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि तणावपूर्ण वातावरण असल्याने त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर होत आहे. 

अमेरिकेत सरकार नेमके ग्लोबल इकॉनोमी संदर्भात काय निर्णय घेते त्यावर देखील सोन्याचे दर हे अवलंबून आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यापेक्षा अधिक सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते अशी शक्यता सुवर्णवसे यांनी व्यक्त केली आहे. सोन्याचे दर 80 हजार 500 रुपये प्रतीतोळे जीएसटी सह तर चांदी 94 हजार रुपये जीएसटी सह आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच आयएसओद्वारे हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर कसे माहिती करुन घ्यायचे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तुम्हालादेखील हा प्रश्न पडला असेल तर 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करू शकता. मिस्ड कॉलच्या काही वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला सोन्याचे दर पाहता येतील. यासोबतच सोने बाजारातील सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

हॉलमार्ककडे लक्ष द्या

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करायला हवी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.