पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंगचे पेपर फुटले

शैक्षणिक गुणवत्तेसाठी देशात दहाव्या क्रमांकावर असणा-या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याचं समोर आलयं.

Updated: May 24, 2017, 08:06 PM IST
पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंगचे पेपर फुटले title=

पुणे : शैक्षणिक गुणवत्तेसाठी देशात दहाव्या क्रमांकावर असणा-या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याचं समोर आलयं. पेपर सुरु होण्याच्या तब्बल ४५ मिनिट आधीच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हे पेपर व्हायरल झाले. त्यामुळे या मागे एक मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय.

सावित्री बाई फुले विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या विविध विषयांचे पेपर परीक्षा सुरु होण्या आधीच विद्यार्थ्यांना मिळत आहेत. या प्रश्नपत्रिका महाविद्यालयांच्या आवारात विकल्या जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिलीये.

परीक्षेच्या आधी जेवढ्या लवकर पेपर मिळेल तेवढ्या जास्त किमतीला तो विकला जात असल्याचंही विद्यार्थांनी सांगितलयं. इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याच्या तक्रारीला कुलगुरुनीही दुजोरा दिलाय. दहा विषयांचे पेपर फुटल्याचं सांगण्यात ये्त असलं तरी मॅथेमॅटिक्स आणि मेकॅनिक्स या दोनचं विषयांचे पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलयं. झालेल्या पेपर फुटीला मात्र त्यांनी महाविद्यालयांनाच जबाबदार धरलयं.