ठाणे : ठाणे महानगरपालिकेत नोकरी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय.
ठाणे महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या 'स्लुसमन' पदाच्या भरतीत हा भ्रष्टाचार झाल्याचं सरनाईक यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना पत्र लिहून भरती प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केलीय.
'स्लुसमन' या पदाच्या भरतीसाठी नियमाप्रमाणे जाहिराती काढून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले. परंतु, पात्र उमेदवारांना डावलून या ठिकाणी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व खाजगी ठेकेदार यांच्या नात्यागोत्यातील व्यक्तींचाच भरणा केल्याचा आरोप सरनाईक यांनी केलाय.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
तसेच जे कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कामावर आहेत अशा उमेदवारांना डावलून ही बोगस भरती करण्यात आलीय. या जागेवर भरती करण्यात आलेल्या व्यक्ती महापालिकेत कामावर नसतानाही त्यांना बोगस अनुभव प्रमाणपत्र देण्यात आल्याचंही सरनाईक यांनी म्हटलंय.
याबाबत योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.