असहिष्णुता : लेखक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केला राज्य पुरस्कार परत

देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असहिष्णुताविरोधात लेखक, साहित्यिक, चित्रपटकर्मी, संशोधक आदींनी आपले पुरस्कार परत केलेत. यात आणखी एका लेखकाची भर पडली आहे. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आपला राज्य साहित्य पुरस्कार रक्कमेसह परत केलाय.

Updated: Nov 10, 2015, 10:12 AM IST
 असहिष्णुता : लेखक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केला राज्य पुरस्कार परत title=
छाया - टविटर

नागपूर : देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असहिष्णुताविरोधात लेखक, साहित्यिक, चित्रपटकर्मी, संशोधक आदींनी आपले पुरस्कार परत केलेत. यात आणखी एका लेखकाची भर पडली आहे. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आपला राज्य साहित्य पुरस्कार रक्कमेसह परत केलाय.

देशात जातीय तसेच वाढत असलेली असहिष्णुता आणि  बुद्धीप्रामाण्यावादी लेकख डॉ. नरेंद्र दाभोळकर, कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जात आहेत. मराठीतील लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या पुरस्कार रक्कमेसह पुरस्कार 'वापसी' केली. आता प्रमोद यांचे नाव या यादीत समाविष्ठ झाले आहे.

१९९४ मध्ये सर्वोकृष्ठ साहित्यामध्ये त्यांच्या १८५७ सत्य आणि अकल्पीत या पुस्तकाला राज्य शासनाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कारासह त्यांना १० हजार रुपये अशी रक्कम मिळाली होती. ही रक्कमही त्यांनी परत केलेय. त्यांना आपला पुरस्कार राज्य शासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे परत केला. तसेच त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.