रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

राज्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबता थांबत नाहीएत. जळगावच्या मेहरूण परिसरातील ममता हॉस्पिटलची रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली आहे.

Updated: Mar 30, 2017, 06:56 PM IST
रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड title=

जळगाव : राज्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबता थांबत नाहीएत. जळगावच्या मेहरूण परिसरातील ममता हॉस्पिटलची रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली आहे.

गरोदर स्त्रीला रुग्णालयात डिलीवरीसाठी दाखल केलं होतं. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यानं महिलेचा मृत्यू झाला. यामुळे दोन रिक्षा भरून आलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. हॉस्पिटलमधील कम्प्युटर, कार यांची तो़डफोड जमावाने केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.