राहुलमध्ये कोणता अभिनेता दिसला? - परेश रावल

राहुल गांधी एफटीआयआयमध्ये येणार असल्याचा सुगावा लागल्यानं अर्थातच विरोधासाठी भाज कार्यकर्तेही फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या गेटबाहेर जमले होते... राहुल गांधी येताच त्यांनी काळे झेंडे आणि निषेधाचे फलक झळकावले.

Updated: Jul 31, 2015, 02:13 PM IST
राहुलमध्ये कोणता अभिनेता दिसला? - परेश रावल title=

पुणे : राहुल गांधी एफटीआयआयमध्ये येणार असल्याचा सुगावा लागल्यानं अर्थातच विरोधासाठी भाज कार्यकर्तेही फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या गेटबाहेर जमले होते... राहुल गांधी येताच त्यांनी काळे झेंडे आणि निषेधाचे फलक झळकावले.

राहुल गांधींसमोर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. इन्स्टिट्युटचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एफटीआयआयच्या गेटबाहेर जमले होते. राहुल एफटीआयआयमध्ये पोहोचताच भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर चौफेर हल्ला सुरू केला.

भाजपा खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी राहुल गांधींवर टीका केलीय. 'राहुल यांच्यात कोणता अभिनेता एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना दिसला?' असा खोचक सवाल त्यांनी केलाय...

तसंच भाजपा प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.