'मनमानी धोरण एका इन्स्टिट्यूटपुरतं नाही तर संपूर्ण देशभर'

पुण्यातल्या एफटीआयआय आंदोलनात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आता उडी घेतल्यामुळं या आंदोलनाला राजकीय वळण लागलंय. राहुल गांधी यांनी एफटीआयआयमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसंच त्यांच्याशी संवाद साधला. 

Updated: Jul 31, 2015, 02:13 PM IST
'मनमानी धोरण एका इन्स्टिट्यूटपुरतं नाही तर संपूर्ण देशभर' title=

पुणे : पुण्यातल्या एफटीआयआय आंदोलनात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आता उडी घेतल्यामुळं या आंदोलनाला राजकीय वळण लागलंय. राहुल गांधी यांनी एफटीआयआयमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसंच त्यांच्याशी संवाद साधला. 

यावेळी, आरएसएस आणि त्याच्या इतर शाखा सगळीकडे हेच करताना दिसत आहेत... राष्ट्रविरोधी किंवा हिंदू विरोधी म्हणणं ही केवळ तुम्हाला चुप्प बसवण्याची योजना आहे, असं म्हणत राहुल गांधींनी आरएसएसला फैलावर घेतलंय. तर हे धोरण केवळ एका एन्स्टिट्यूटपुरतं मर्यादीत नाही तर सगळ्या देशाबाबतीत आहे, असं म्हणत राहुनं मोदी सरकारवरही निशाणा साधला. त्यांना एकच आयडिया का हवीय? अनेक आयडिया का नकोत? असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला.

'जर, विद्यार्थी तुम्हाला (गजेंद्र चौहान) स्वीकारत नसतील तर तुम्ही तिथं असताच कामा नये' असं राहुल गांधी यांनी गजेंद्र चौहान यांना उद्देशून म्हटलंय. 

यावेळी विद्यार्थ्यांनी राहुल गांधींसमोर समस्या मांडल्या. राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय. तसंच सरकारकडून लोकशाही मुल्ल्यांची पायमल्ली होत असल्याचाही आरोप केलाय. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींना आंदोलकांना दिलंय. 

राहुल यांच्यासोबत यावेळी सिनेअभिनेता आणि माजी मंत्री चिरंजीवी आणि राज बब्बरही उपस्थित होते. विद्यार्थ्याच्या आंदोलनाचा आज ५०वा दिवस आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.