जळगाव : महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासंदर्भातील हा फोटो सध्या व्हॉटस अॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा फोटो खराखुरा नाही, हा फोटोशॉपमध्ये बनवण्यात आल्याचं एका नजरेत दिसतं.
या फोटोत पंकजा या सिंहासनावर आहेत. तर, त्याच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे सुरक्षा रक्षकाच्या वेशात आहेत.
'आपल्याला असंच पाहिजे' असे लिहत अशोक लडवंजारी नावाच्या फेसबुक अकाउंटवर ही पोस्ट टाकण्यात आली.
मात्र, माझ्या नावानं बनावट अकाऊंट उघडून ही पोस्ट व्हायरल केल्याचा दावा लाडवंजारी यांनी केला. लाडवंजारी हे भाजपचे माजी महानगराध्यक्ष आणि खडसे यांचे समर्थक आहेत. या पोस्टमुळे राजकीय चर्चेला सध्या उधाण आले आहे.