नागपूर : नोटबंदीनंतर संपूर्ण देशात हाहाकार मजला असतानाच नागपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास 1 कोटी रुपायाची रोकड सापडल्यानं खळबळ माजली होती. ही रक्कम रायसोनी समुहाची असल्याचं तपासात उघड झालं आहे.
जळगावहून नागपूरात ही रोकड रायसोनी समुहाच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहीती लाचलूचपत विभागानं दिली आहे. या रकमेच्या वैधतेबाबत आयकर विभाग तपास करत आहे. नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी जवळ एका गाडीत ही रक्कम सापडली होती. या प्रकरणी लाचलूचपत विभागानं दोघांना ताब्यत घेतलं आहे.