मराठवाड्यावर बाप्पाची कृपा, पाणीप्रश्न सुटणार?

पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्यादांच वरुणराजानं जोरदार हजेरी लावलीय. लातूरमध्येही सात ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालीय. कासारखेडा, चाकूर, शेळगाव, वडवळ, कासारशिरसी, हेर आणि साकोळमध्ये जोरदार पाऊस झालाय.

Updated: Aug 31, 2014, 06:03 PM IST
मराठवाड्यावर बाप्पाची कृपा, पाणीप्रश्न सुटणार? title=

लातूर: पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्यादांच वरुणराजानं जोरदार हजेरी लावलीय. लातूरमध्येही सात ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालीय. कासारखेडा, चाकूर, शेळगाव, वडवळ, कासारशिरसी, हेर आणि साकोळमध्ये जोरदार पाऊस झालाय.

लातूर जिल्ह्यात 41.24 मिमी इतक्या पावसाची नोंद झालीय. पहिल्यांदाच आलेल्या जोरदार पावसामुळx बळीराजा सुखावलाय. तसंच काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.

दरम्यान, मराठवाड्यात सुरु असलेल्या संततधारेमुळं शेतकऱ्यांसह नोकरदारवर्गही सुखावला आहे. नांदेड, जालना, बीड, लातूर य़ासह अनेक भागात चांगला पाऊस बरसतो आहे. बीडच्या माजलगाव धरणक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्यानं बीडकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर नांदेडमधल्या दमदार पावसानं विष्णूपरी प्रकल्प 40 टक्के भरला आहे.

तिकडे कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. संगमेश्वर शहरातल्या बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं आहे. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मुसळधार पावसामुळं संथगतीनं सुरु आहे. याचबरोबर येत्या काही दिवसात मध्य महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.