भारतीय भाजीपाल्याला उघडली युरोपीय कवाडे

भारतीय भाजीपालाला युरोपीय देशाची कवाड खुली झाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लहरी हवामान नोटबंदीचा फटका  बसलेल्या शेतकर्याला आता कुठे अच्छे दिनचे स्वप्न पडू लागलेत..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 4, 2017, 11:30 PM IST
भारतीय भाजीपाल्याला उघडली युरोपीय कवाडे  title=

मुकूल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : भारतीय भाजीपालाला युरोपीय देशाची कवाड खुली झाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लहरी हवामान नोटबंदीचा फटका  बसलेल्या शेतकर्याला आता कुठे अच्छे दिनचे स्वप्न पडू लागलेत..

युरोपिय राष्ट्रांमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची निर्यात केली जाते. स्थानिक बाजारपेठांमध्ये मिळणा-या उत्पन्नापेक्षा निर्यातक्षम उत्पादन घेऊन जास्त उत्पन्न घेण्याचा शेतक-याचा प्रयत्न असतो. मात्र गेल्या काही वर्षापासून देशातील  भाजीपाला, अळूची पाने, वांगी, फळभाज्यांना युरोपचे दरवाजे बंद झाले होते. काही भाजीपाल्यात कीड, अळी आढळून आल्यानं भाजीपाल्याला युरोपीय खंडाचा दरवाजा बंद झाला होता.  मात्र आता पुन्हा एकदा युरोपने कवाडं उघडी केलीयत. 

निर्यात होणाऱ्या भाजीपाल्यात नाशिकच्या शेतक-यांचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र निर्यात करताना आवश्यक घबरदारी घेण्याचा सल्ला कृषी अधिकारी देतात. 

यंदाच्या वर्षी पर्जन्यमान समाधानकारक झालं आहे. त्यामुळे कृषी उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्यातच युरोपिय बाजारपेठ खुली झाल्याने शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सरकारने ठामपणे शेतक-यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे.