पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा पराभव

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळतेय. अद्याप येथील मतमोजणी सुरु आहे. 

Updated: Feb 23, 2017, 02:46 PM IST
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा पराभव title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळतेय. अद्याप येथील मतमोजणी सुरु आहे. 

यातच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. प्रभाग क्र २९ मधील राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा पराभव झालाय.

भाजपच्या उषा मुंढे यांच्याकडून शकुंतला यांचा पराभव झालाय. 3526 मतांनी महापौर पराभूत झाल्यात.