नाशिकमध्ये १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त

 झायलो कारमधून पोलिसांनी मुंबई नाका येथील द्वारका परिसरातून एक कोटींची रक्कम जप्त केली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2017, 04:50 PM IST
नाशिकमध्ये १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त title=

नाशिक : नाशिकमधील मुंबई नाका परिसरात १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.  ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटांचा यात समावेश असल्याने हे पैसे जप्त करण्यात आले आहेत.

 झायलो कारमधून पोलिसांनी मुंबई नाका येथील द्वारका परिसरातून एक कोटींची रक्कम जप्त केली. 

यात नाशिकमधील सराफ व्यावसायीकाचाही समावेश आहे या प्रकरणी ५जणांना अटक केली असून सर्व नोटा या जुन्या आहेत. नोटाबंदीनंतर देशभरातील अनेक ठिकाणी जुन्या नोटा सापडत आहेत.

दरम्यान, काळ्या पैशाविरोधात कडक पाऊल उचलण्यासाठी मोदी सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या.