अहमदनगर : जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीपात्राच्या परिसरात मोठया प्रमाणात हरणांचा वावर वाढला आहे. या भागातील शेतकरी वस्तीवरही हरणांचा मुक्त संचार पहायला मिळतो आहे.
हरणांचे मोठे कळप पाणी आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्तीच्या आसपास पहायला मिळत आहेत. हरणांच्या या वावरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे.
राहाता तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे हरणाचं पिलू असल्याची माहीती, वन विभागाला मिळाल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आलं आहे.