नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस... सत्ताधारांसाठी हे अधिवेशन गेल्या तीन अधिवेशनच्या तुलनेत खुपच सोपं ठरलंय.
महागाई, डाळीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील कायदा सुस्ववस्था, दुष्काळ - शेतकरी आत्महत्या, केंद्राची मदत असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती होते. पण मुद्दे असून सुद्धाविरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यात साफ अपयशी ठरले. कायदा सुव्यवस्थासारखा विषय अधिवेशनच्या शेवटच्या आठवड्यात विरोधक अंतिम आठवडा प्रस्तावद्वारे उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधारी यांना हा अधिवेशनाचा हा पेपर खुपच सोपा गेला.
सत्तेत असलेल्या शिवसेनेने अणे यांचा मुद्दा उपस्थित करत काही काळ वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला खरा. पण भाजपाने डावपेच आखून हा मुद्दा फार ताणू दिला नाही. राज्यात शेतकऱ्यांसाठी पॅकेज देऊन मुख्यमंत्र्यांना बॅकफुट लोटले. त्यामुळे अधिवेशनाच्या आधी अडचणीत दिसणारे सत्ताधारी अधिवेशन संपतांना निर्धास्त झाले आहेत
महागाईवरून केवळ आरडा-ओरड
विधानपरीषदेत महागाईवरुन विरोधकांनी केवळ आरडा-ओरड केली. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी डाळीच्या मुद्यावरुन सरकारवर आरडा-ओरड केली. डाळीच्या साठेबाजीवर असलेले निर्बंध उठण्याची कोणतीही मागणी अथवा प्रस्ताव नसताना, हे निर्बंध का उठवले गेले? आणि डाळीच्या फाईलवर 'आभार' असा शेरा लिहिला गेलाय? त्यासाठी कोणती तडजोड केली? हे जनतेला सांगा... असा सवाल धनजंय मुंडे यांनी सरकारला केलाय. तर अधिकारी नियंत्रणात येत नसतील तर राजीनामे द्या, असा टोला शरद रणपिसेंनी अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना लगावलाय.
घोटाळ्यांचा आरोप
राज्यात चिक्की, डाळ, शिक्षण, फोटो, आदिवासी विभागात घोटाळे झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.. या घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलीय.