मुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार

मुंबई आणि कोकणातील प्राध्यापकांना ७३ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Updated: Dec 22, 2015, 10:28 PM IST
मुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार title=

नागपूर : मुंबई आणि कोकणातील प्राध्यापकांना ७३ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

आमदार कपिल पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे मुंबई आणि कोकणातील कॉलेज प्राध्यापकांसाठी सहाव्या वेतन आयोगाची शिल्लक थकबाकी आणि २०१० नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पगाराची थकबाकी त्यांना आता मिळणार आहे. ही थकबाकी तब्बल ७३ कोटी रुपयांची आहे. 

लोकभारतीचे अध्यक्ष शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी हा प्रश्न गेल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनात सभागृहात लावून धरला होता. विधान परिष नियम ९३ अन्वये त्यांनी लिेल्या सूचनेवर आज अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही थकबाकी देण्याची घोषणा केली, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.