नागपूर : राज्यभरातील संगणक परिचालकांनी आज सकाळी विधानभवनावर काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यावेळी आंदोलकांना दगडफेक केल्याची घटना घडली. दरम्यान, अनेक जणांची धरपकड पोलिसांनी केली.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना नागपूर येथे मंगळवारी आलेल्या सुमारे २० हजार संगणक परिचालकांनी मोर्चा विधानभवनावर काढला. विधानभवनाजवळ मोर्चा येताच तो अडविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमान पांगविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारीत अनेक जण गंभीर जखमी झालेत.
मोर्चावर पोलिसांचा लाठीमार केला. लाठीमारीमुळे मोर्चात तणावाक भर पडली. परिचालकांचे मंगळवारपासून टेकडी रोडवर आंदोलन सुरु केलेय. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मोर्चा स्थळावर आंदोलन सुरू ठेवण्याचा संगणक परिचालकांनी निर्धार केलाय.