शिर्डीला निघालेल्या भाविकांना कारने उडविले, एकाचा मृत्यू तर ४ जखमी

शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४ जखमी झालेत.

Updated: Dec 16, 2015, 10:16 AM IST
शिर्डीला निघालेल्या भाविकांना कारने उडविले, एकाचा मृत्यू तर ४ जखमी title=
संग्रहीत

ठाणे : शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४ जखमी झालेत.

या अपघातात सुधीर कलप (२३) या तरुणाचा मृत्यू झाला तर, ४ पदयात्री गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतील मालाड येथील कुरार भागातील ओम साई ग्रुपच्या साई पालखीमधून हे पदयात्री शिर्डीला जात होते. भिवंडी तालुक्यातील कुकसे भोईप पाडा गावातून पदयात्री जात असताना भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने पदयात्रींना उडवले. 

सुधीर याचा अपघातामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचा चालक गाडी तिथेच सोडून पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.