मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लक्झरी-मिनीबसचा अपघात, ११ ठार २० जखमी

गुजरात-महाराष्ट्र सीमेवर भीषण अपघात झालाय. लक्झरी बस आणि मिनीबसमध्ये धडक झालीय. या अपघातात ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरमधील आच्छाड गावाजवळ पहाटे अपघात झाला. जखमींवर तलासरी आणि वापीत उपचार सुरु आहेत. 

Updated: May 25, 2015, 09:28 AM IST
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लक्झरी-मिनीबसचा अपघात, ११ ठार २० जखमी title=

पालघर: गुजरात-महाराष्ट्र सीमेवर भीषण अपघात झालाय. लक्झरी बस आणि मिनीबसमध्ये धडक झालीय. या अपघातात ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरमधील आच्छाड गावाजवळ पहाटे अपघात झाला. जखमींवर तलासरी आणि वापीत उपचार सुरु आहेत. 

मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातमधील नडीयाद इथल्या प्रवाशांना घेऊन एक खासगी लक्झरी बस मुंबईकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अच्छाड गावाजवळ विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मिनी बसनं धडक दिली.

ही टक्कर ऐवढी भीषण होती की अपघातात ११ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिनी बस डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूला गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.