औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

औरंगाबाद शहरात एका अल्पवयीन मुलीनं रोडरोमियोच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. शहरातील बालाजी नगरमध्ये राहणारी सतरा वर्षीय युवती बारावीत शिकत होती. 

Updated: Jul 29, 2015, 10:10 PM IST
औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या title=

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात एका अल्पवयीन मुलीनं रोडरोमियोच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. शहरातील बालाजी नगरमध्ये राहणारी सतरा वर्षीय युवती बारावीत शिकत होती. 

कॉलेज सुटल्यानंतर ट्यूशनसाठी जाताना रोड रोमियो संदीप भसांडे तिचा पाठलाग आणि छेडछाड करायचा. या मुलीनं घडत असलेला सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या पालकांनी छेडछाड करत असलेल्या मुलाची समजूत काढली. पण त्या मुलानं आणि त्याच्या आई-वडीलांनी मुलीच्या पालकांवरच आरोप-प्रत्यारोप केलेत आणि त्या मुलानं छेडछाडीचा प्रकार सुरूच ठेवला. 

शेवटी घडत असलेल्या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित युवतीनं राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलयं. 

"आई-बाबा सॉरी… मवाल्याच्या त्रासाला कंटाळून जग सोडत आहे,"
सुसाईड नोटमध्ये तिनं लिहून ठेवलं होतं. 

याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी संदीप भसांडे या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय. कोर्टानं त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.