नालासोपाऱ्यात ज्वेलर्स दुकानात चोराचा चाकू धाक दाखवून नंगानाच

नालासोपारात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना, शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरांनी कशाप्रकारे चाकूच्या साहय्यानं नंगानाच सुरू केला होता. हे ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीत कैद झालंय. भयानक दृश्य असलं तरी कायद्याचा कशाप्रकारे बोजवारा उडाला याचं सत्य समोर येतंय.

Updated: Nov 25, 2014, 01:05 PM IST
नालासोपाऱ्यात ज्वेलर्स दुकानात चोराचा चाकू धाक दाखवून नंगानाच   title=

नालासोपारा : नालासोपारात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना, शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरांनी कशाप्रकारे चाकूच्या साहय्यानं नंगानाच सुरू केला होता. हे ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीत कैद झालंय. भयानक दृश्य असलं तरी कायद्याचा कशाप्रकारे बोजवारा उडाला याचं सत्य समोर येतंय.

चोरानं बाहेर पळताना रेल्वेस्थानकाजवळ गजबजलेल्या ठिकाणी एका इसमास चाकूनं वारही केले. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजत असताना, मीडिया छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देत असल्याचा जावई शोध नालासोपाराचे पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी लावला. आणि या संदर्भात मीडियाला कोणतीही माहिती देण्याचं टाळलं.

 टि.व्ही.वर दिसणारी दृश्य आपल्याला विचलीत ही करू शकतात. कायदा व सुव्यवस्थेचे कशाप्रकारे चोर दरोडेखोर धिंधवडे काढत आहेत याचा बोलकं चित्र समोर आले आहे. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज चौकीच्या १०० मिटर जवळ आचोळे रोड मुख्य रस्त्यालगत असलेल्या गगन गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानात सोमवारी रात्री ९.२० च्या सुमाराचे हे दृश्य कैद झाले आहे.

सोमवारी दुकान बंद होतं. मात्र, साफसफाईसाठी ज्वेलर्सने दुकान उघडून ठेवलं होतं. तेवढयात दुकानात तोंडावर रुमाल बांधलेला, हातात ग्लोज घातलेला, डोक्यावर टोपी असा एक माणूस दुकानात शिरला आणि चैन दाखवायला सांगितलं. मात्र दुकान बंद झाल्यामुळे काहीही दाखवणारं नसल्याचं सांगताच हातातील बॅगमधून सोळा इंचाची चाकू काढून त्याने धमकावले. सर्व सोने बॅगेत टाकायला सांगतले. मात्र नकार मिळाल्याने ज्वेलर्स मालकाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत चाकू हल्ला केला.

दरम्यान, दुकानात खोटे दागिने असल्याचं कळल्यावर चोराने दुकानातून धूम ठोकली. दुकानातून पळाल्यानंतर चोराने नालासोपारा रेल्वे स्टेशन जवळ आपल्या पत्नीची वाट बघतं असलेल्या विराज निकम यांला धक्का दिला. मात्र विराजने. त्या चोराला  पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने त्याच्या हातावर चाकूने वार करत त्याला जखमी केलं. सध्या विराजवर नालासोपारातील विजया लक्ष्मी रुग्णायात उपचार सुरू आहेत. 

कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजत असताना, मीडिया छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देत असल्याचा जावई शोध नालासोपाराचे पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी लावला. मीडियाला या संदर्भात कोणतीही माहिती देण्याचं टाळलं.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.