'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर

भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

Updated: Nov 25, 2014, 12:53 PM IST
'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर title=

मुंबई : भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

मोबाईलचे पैसे भरतात, मग वीजेचं बिल का नाही भरत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. यावरून एकनाथ खडसे हे भाजपचे अजित पवार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती, या टीकेला एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

मोबाईलचे पैसे भरतात, मग वीजेचं बिल का नाही भरत?, या माझ्या वाक्याचा विपर्यास केल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी थकलेल्या वीज पंपाच्या बिलांसाठी कृषी संजीवनी योजनेला आणखी मुदतवाढ दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

मात्र शेतकऱ्यांना वीजपंपही वापरला नाही, तरीही अव्वाच्या सव्वा बिलं येत असल्याची तक्रार आहे, अनेक ठिकाणी कमी दाबामुळे ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत, पिकं वाळण्याची भीती व्यक्त केली जातेय. 

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याबरोबर, वीज आकारणी सुधारण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.