पुणे : नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून 'बडीकॉप' हा एक क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
महिला दिनाचं औचित्य साधत आज या उपक्रमाची सुरवात होतेय. या उपक्रमार्तंगत 40 महिलांमागे एक बडीकॉपची नेमणूक करण्यात येणार आहे.
हा बडीकॉप एका व्हाटस ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या संपर्कात राहणार आहे. अडचणीच्या वेळी या महिला आपल्या बडिकाँपला मदतीसाठी संपर्क साधू शकणार आहेत.
'बडीकॉप'वर महिलांना प्रतिसाद मिळाला नाही तर त्या महिलेच्या तक्रारीचा दूरध्वनी थेट संबंधित पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या आधिकाऱ्यापर्यंत पोहचेल, अशी माहितीही शुक्ला यांनी दिलीय.
या बडीकॉपच्या ग्रुपचं सदस्य होण्यासाठी महिलांनी जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलंय.