थंडीचा कडाका, सातपुड्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची चादर

गेल्या पाच दिवसापासून सातपुड्याच्या डोंगर रांगा पांढ-या रंगाचा शालू पांघरून बसल्या आहेत. हिवाळ्यामध्ये हिरवळीने सजलेला हा परिसर आता बर्फाच्या कणांनी आच्छादला गेला आहे. 

Updated: Dec 22, 2014, 11:50 AM IST
थंडीचा कडाका, सातपुड्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची चादर title=

नंदुरबार : गेल्या पाच दिवसापासून सातपुड्याच्या डोंगर रांगा पांढ-या रंगाचा शालू पांघरून बसल्या आहेत. हिवाळ्यामध्ये हिरवळीने सजलेला हा परिसर आता बर्फाच्या कणांनी आच्छादला गेला आहे. 

नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमधील डाब, मोलगी, पाटीलपाडा या परिसरात तापमानाचा पारा २ अंश सेल्सियसपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे या भागातील दव बिंदूचं रुपांतर बर्फांमध्ये झालं आहे. 

तापमान खाली गेल्याने इथल्या आदिवासी बांधवाना मात्र चांगल्याच थंडीचा सामना करावा लागत आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे सातपुड्यातील जनजीवनही विस्कळीत झालं आहे.

उत्तर भारत गारठला
कडाक्याच्या थंडीनं सध्या उत्तर भारत गारठलाय.  दिल्लीमध्ये आज हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून दिल्लीचा पारा 4.2 अंशांपर्यंत उतरलाय. धुक्यामुळे शहरातील रेल्वे, रस्ते आणि विमान सेवेवरही परिणाम झाला. 

पत्नासहून अधीक ट्रेन उशिराने धावत असून रस्तेवाहतूकही मंदावलीये. पालम भागात झीरो व्हीजीबिलीटीची नोंद झाली. कश्मीर, हिमाचलमध्येही जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे त्यामुळे पारा आणखी उतरण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.