मी मंत्रीपद सोडतोय, काँग्रेस नाही - नारायण राणे

काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज कुडाळमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी, त्यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांना क्षमवण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Jul 18, 2014, 09:13 PM IST
मी मंत्रीपद सोडतोय, काँग्रेस नाही - नारायण राणे title=
फाईल फोटो

सिंधुदुर्ग : काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज कुडाळमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी, त्यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांना क्षमवण्याचा प्रयत्न केलाय. 

काँग्रेसचा राजीनामा देऊन नारायण राणे इतर पक्षांचा हात धरण्याच्या तयारीत असलेल्या वृत्ताला फाटा देत नारायण राणे यांनी आपण केवळ 'मंत्रिपदाचा राजीनामा देतोय... पक्षाचा नाही' असं सांगितलंय. मात्र, यावेळी काँग्रेसवर आणि मुख्यमंत्र्यांवर नाराज असलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आपल्या टीकेचं लक्ष्य केलेलं दिसलं. 

पाहुयात, यावेळी आणखी काय काय म्हटलंय नारायण राणेंनी...
> राणेंची उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका

> महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल असे वाटते ती येणार नाही - राणे

> जे काही १७ खासदार निवडून आले ते मोदी कृपेने

> बाळासाहेबांना सर्वाधिक मानसिक त्रास दिला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी

> बाळासाहेबांना त्रास नाही छळलं आहे- राणे

> महाराष्ट्राचा अभ्यास करं, न्याहाळ मग उद्धवने सीएम पदाची स्वप्नं बघावी

> उद्धव ठाकरेंचे राजकारण हे उदरनिर्वाहचे साधन आहे - राणे

> मी काँग्रेस सोडणार नाही. फक्त मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे.

> सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दुपारी सादर करणार

> नवा पक्ष काय एका महिन्यात काढला जात नाही

> मोदी फॅक्टर आगामी निवडणुकीत राहणार नाही - राणे

> 'उद्धव ठाकरे महाराष्ट्रात तुमची सत्ता येणार नाही'

> 'बाळासाहेबांचं नाव घेण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही'

> 'कोकणात दहशत असल्याचा उद्धव ठाकरे करतायत कांगावा'

> भयभीत लोक कोकण भयमुक्त काय करणार?

> राजीनाम्यामुळे भूकंप झाला तर माझा दोष नाही

> राजीनाम्यामागचा माझ हेतू समजून घ्यावा 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.