शनी चौथऱ्यावर जाल तर खबरदार - हिंदू संघटनेचा इशारा

 शनी शिंगणापूर इथं महिलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन मिळावं यासाठी 26 जानेवारीला चारशे महिला एकत्र येऊन शनिशिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडनं दिला होता. मात्र आता या घटनेला विरोध करण्यासाठी हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत. 

Updated: Jan 7, 2016, 06:09 PM IST
शनी चौथऱ्यावर जाल तर खबरदार - हिंदू संघटनेचा इशारा  title=

शनी शिंगणापूर :  शनी शिंगणापूर इथं महिलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन मिळावं यासाठी 26 जानेवारीला चारशे महिला एकत्र येऊन शनिशिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडनं दिला होता. मात्र आता या घटनेला विरोध करण्यासाठी हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत. 

हिंदू परंपरा मोडीत काढणाऱ्या या भूमाता ब्रिगेडला राज्यातील सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन विरोध करणार असल्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिलाय.

 

26 जानेवारीला राज्यातील सर्व हिंदू संघटनांना एकत्र करून या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना विरोध करणार असल्याचं या समितीने सांगितलंय. हिंदू जनजागृती समिती संपूर्ण राज्यात येत्या ९ जानेवारीपासून हिंदू परंपरा रक्षण मोहीम राबवणार असून त्याची सुरुवात शनि शिंगणापूर पासून करणार आहे. 

एकीकडे अंधश्रद्धा निर्मुलन समिती पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि परंपरा याला विरोध करत आहे तर दुसरीकडे परंपरेचे रक्षण करण्यासाठी हिंदू संघटनांनी कंबर कसलीये.