आजोबाचे नातीशी अश्लील कृत्य, आईने केली आत्महत्या

आजोबांनी चार वर्षांच्या नातीशी अश्लील कृत्य केल्याने मुलीच्या आईने आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील बालाजीनगर येथे घडली.

Updated: Aug 25, 2015, 04:57 PM IST
आजोबाचे नातीशी अश्लील कृत्य, आईने केली आत्महत्या  title=

पुणे : आजोबांनी चार वर्षांच्या नातीशी अश्लील कृत्य केल्याने मुलीच्या आईने आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील बालाजीनगर येथे घडली.

आणखी वाचा : बालगृहातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संस्थेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निष्फळ

रूपाली संदीप मोपेरकर (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रूपाली आणि संदीप यांचा विवाह ३१ जुलै २०१० रोजी झाला.

पोलिसांनी तिचा पती संदीप नंदकुमार मोपेरकर याला अटक केली असून रूपालीचा सासरा नंदकुमार आणि सासू सुनंदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा : कात्रजमध्ये चिमुरडी सापडली, आईनंच सोडलं बसस्टॉपवर

रुपालीचा सासरच्या व्यक्तींनी तिचा सतत छळ करत होते. अशातच गेल्या २३ ऑगस्ट रोजी सासरा नंदकुमारने रूपालीच्या चार वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. ही घटना सहन न झाल्याने तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.