भावी वधूकडे केली 'न्यूड सेल्फी'ची मागणी म्हणून...

लग्नापूर्वी आपला जोडीदार कसा दिसतो, हे दुसऱ्या जोडीदारासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. पण, लग्नापूर्वी आपल्या भावी वधूकडे मुलानं 'न्यूड सेल्फी'ची मागणी केल्याची घटना उडकीस आलीय. 

Updated: Aug 25, 2015, 05:06 PM IST
भावी वधूकडे केली 'न्यूड सेल्फी'ची मागणी म्हणून... title=

ठाणे : लग्नापूर्वी आपला जोडीदार कसा दिसतो, हे दुसऱ्या जोडीदारासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. पण, लग्नापूर्वी आपल्या भावी वधूकडे मुलानं 'न्यूड सेल्फी'ची मागणी केल्याची घटना उडकीस आलीय. 

ही धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. ठाण्यात राहणाऱ्या जिंतेंद्र रामकृष्ण या ३३ वर्षीय तरुणाचं लग्न त्याच भागातील एका मुलीसोबत जमलं होतं. घरच्यांचं बोलणंही झालं होतं. दोन्ही कुटुंबीय खुश होते. पण, त्यांचा आनंद काही फार काळ टिकला नाही.

मुलानं आपल्याकडे 'न्यूड सेल्फी'ची मागणी केल्याची तक्रार मुलीनं दाखल केलीय. इतकंच नाही तर, त्याची ही मागणी आपण पहिल्यांदा मस्करीत घेतली पण, त्यानंतरही त्यानं आपल्याकडे वारंवार 'न्यूड सेल्फी'ची मागणी सुरुच ठेवली. शेवटी तर त्यानं असा फोटो पाठवला नाही तर लग्नच न करणार नाही, अशीही धमकी दिल्याचं मुलीचं म्हणणं आहे.

अधिक वाचा - पॉर्न अलर्ट : प्रायव्हेट चॅटचा शॉकिंग क्लायमॅक्स

यामुळे, शेवटी वैतागून भावी वधूनं आपल्या कुटुंबीयांना याची कल्पना देत पोलीस स्टेशन गाठलं... साहजिकच, हे लग्न इथंच मोडलं. सोबतच, मुलीनं मुलावर तीन लाख रुपये हुंडा मागितल्याचाही आरोप केलाय. 

दरम्यान, पोलिसांनी जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतलंय. पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. 

अधिक वाचा - बनावट फेसबुक अकाऊंट उघडून महिलांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्याला अटक

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.