कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीस सुधारणा झाली आहे. पानसरे यांच्या शरीरातील गोळी बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.
पानसरे दाम्पत्यांवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण सचिव मेधा गाडगीळ यांना दिले आहे. तसेच गरज भासल्यास एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
Also asked to use services of doctors known for their expertise & if required use air ambulance to bring them to Mumbai for treatment(2/2)
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2015
गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ५ संशयित ताब्यात घेतले होते. पाचही जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गोविंद पानसरे यांच्या डाव्या खांद्यातील गोळी काढण्यात यश आले असून प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे माहिती डॉक्टरांनी दिली.
पानसरे यांच्यावर शस्त्रक्रिया करुन घसा आणि मानेतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यात आला. एक शस्त्रक्रिया यशस्वी झाली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.आता धोक्यातून ते बाहेर आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.