आबा गेल्याने नक्षलग्रस्त भागातल्या ५१ मुलांवर शोककळा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागातील ५१ मुलामुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणलं होतं. आबांच्या जाण्याने या मुलांवर शोककळा पसरली आहे. 

Updated: Feb 17, 2015, 10:25 AM IST
आबा गेल्याने नक्षलग्रस्त भागातल्या ५१ मुलांवर शोककळा  title=

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागातील ५१ मुलामुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणलं होतं. आबांच्या जाण्याने या मुलांवर शोककळा पसरली आहे. 

पुण्यातल्या सुभाषचंद्र सैनिकी शाळेत ही मुलं शिकत आहेत. आबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी ही मुलं पायी चालत आळंदीपर्यंत गेली होती. या मुलांनी महाराष्ट्राचे लाडके 'आबा' यांच्यावर एक कविताही केली आहे. या विद्यार्थ्यांनी आर आर आबांना कविता करुन श्रद्धांजली वाहली. 

गेल्या तीन महिन्यांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाच्या विरोधातली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. लीलावतीमध्येच त्यांनी सोमवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. सांगलीतल्या तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर. आर. आबांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली.

ग्राम स्वच्छतेसाठी आबांनी राबवलेलं गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि त्यांनी घेतलेला डान्सबार बंदीचा निर्णय प्रचंड गाजला. आबांच्या निधनामुळं तळागाळातून काम करत, सत्तास्थानापर्यंत पोहोचलेला एक सच्चा, प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारणी कायमचा हरपलाय, अशी सहवेदना सर्वच पक्षीय नेत्यांनी व्यक्त केलीय. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.