अजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज

 अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी, असा प्रकार नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  छगन भुजबळांबद्दल आपण विधानसभेच्या प्रचारातही बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated: Jun 23, 2015, 02:37 PM IST
अजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज title=

रत्नागिरी :  अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी, असा प्रकार नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  छगन भुजबळांबद्दल आपण विधानसभेच्या प्रचारातही बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्य़ावर आहेत. मालवणी विषारी दारूच्या प्रकरणात राज ठाकरेंनी सरकारला फटकारलं आहे. सरकारचा अवैध धंद्यांवर अंकुश नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जैतापूर प्रकल्पाच्या विरोधावरून राज ठाकरेंनी शिवसेनेला सवाल केले आहेत. जैतापूरबद्दलची शिवसेनेची नेमका भूमिका काय, सत्तेत राहुनच आंदोलनं का करता, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.