नाशिक : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने घोटी, इगतपुरी, त्रिंबक परिसराला चांगलंच झोडपलंय. समाधानाची बाब, म्हणजे धरणक्षेत्रात पाऊस पडल्याने धरणातही पाणीसाठा जलदगतीने वाढतोय. दारणा नदीला पूर आल्याने चौदा गावांचा संपर्क तुटलाय.
इगतपुरी तालुक्यातल्या काळुस्ते परिसरातल्या चौदा गावांचा जोडणारा पूल... पूर्वी या ठिकाणी कमी उंचीचा पूल होता. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात पूर आला की या गावांचा संपर्क तुटणे कायमचे झाले होते. गेल्या पावसाळ्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सो़डवण्यासाठी सरकारने नवा पूल घोषित केला. कामही देण्यात आलं. मात्र वर्ष उलटून गेलं तरी पुलाचं काम झालेलं नाही. पर्याय म्हणून तयार केलेला कच्चा रस्ताही वाहून गेलाय. त्यामुळे कांचन गाव कालुस्ते अशा विविध गाव पाड्यातील लोक अडचणीत आले आहेत.
आता शिडीने आणि जेसीबीने ग्रामस्थांना पुलावर आणलं जाण्याचा पराक्रम प्रशासन करत आहे. घोटीवासियांचं सिलेंडर गोदाम या परिसरात असल्यामुळे इंधन पुरवठा थांबणार आहे. या परिसरातील दोन हजार शाळकरी मुलं शाळेपासून वंचित आहेत. नवा पूल बांधून पूर्ण होईपर्यंत जुना पूल तोडला जात नाही. जुन्या पुलाच्या शेजारीच नवा पूल बांधला जातो. मात्र प्रशासनाने नवा पूल बांधायला घ्यायच्या आधीच जुना पूल तो़डून टाकलाय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दारणा नदीत २४ तासांत ही अवस्था झालीय. दोन आठवड्यात दुथडी भरू पूर आल्याने ते बांधकाम टीकेल की नाही अशी शक्यता निर्माण झालीय. प्रशासनाला या संकटाची पूर्वकल्पना असूनही कारवाई का झाली नाही. ग्रामस्थांचा वैद्यकीय पुरवठाही तुटलाय. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी इथे कोणाचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील अशी ग्रामस्थांची भावना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.