मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या आरोप या प्राध्यापकावर आहे.

Updated: Jun 8, 2016, 12:14 AM IST
मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप title=

यवतमाळ : मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या आरोप या प्राध्यापकावर आहे.

हा प्राध्यापक मनोविकृतीशास्त्र विभागाचा असल्याचा सांगण्यात येतंय. प्राध्यापकाला बेदम ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. विद्यार्थिनींनी चोप देत प्राध्यापकाला अधिष्ठातांच्या कक्षापर्यंत नेले. हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

सदर सहायक प्राध्यापकाकडे मनोविकृतीशास्त्र विभागाची जबाबदारी असून त्याने एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची शिबिरादरम्यान छेड काढली होती.