घरात घुसून विनयभंग केल्याने युवतीची आत्महत्या

पीडीत मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर एकच आक्रोश केला आहे, त्यांनी आम्हाला न्याय द्या

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 20, 2017, 07:59 PM IST
घरात घुसून विनयभंग केल्याने युवतीची आत्महत्या title=

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून दिला जाणाऱ्या त्रासामुळं आणि घरात घुसुन केलेल्या विनयभंगामुळं, कोल्हापुरातील बोंद्रेनगर इथल्या गीता बोडेकर या 20 वर्षीय युवतीनं गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

काही महिन्यापूर्वी याच परिसरातील एका युवतीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशी घटना घडल्यामुळं परिसरात संताप व्यक्त होत आहे.

पीडीत मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर एकच आक्रोश केला आहे, त्यांनी आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. पीडीत तरूणी गरीब कुटुंबातील असल्याचं दिसून येतं.