ठाणे : सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीनं, रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली.
ठाण्यातली ही घटना आहे. हा तरुण एका मुलीची सतत छेड काढायचा. आधी त्या मुलीनं त्याकडे दुर्लक्ष केलं. तरीही त्याच्याकडून त्या मुलीची छेड काढणं सुरुच होतं.
त्यामुळे संयमाचा बांध तुटलेल्या त्या मुलीनं, अखेर दु्र्गावतार धारण केला आणि या स्त्री लंपट तरुणाला बदडलं.
त्यानंतर नौपाडा पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केलीय.