भ्रष्टाचाऱ्यांसमोर 'बुलेटमॅन'चं सपशेल सरेंडर

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाऱ्यांसमोर सपशेल घुडघे टेकल्याचं दिसून आलं आहे. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली, तर अख्खं जलसंपदा खातंच निलंबित करावं लागेल, मंत्र्यांनी सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत, आता कुणाकुणावर कारवाई करावी, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 26, 2015, 05:43 PM IST
भ्रष्टाचाऱ्यांसमोर 'बुलेटमॅन'चं सपशेल सरेंडर title=

पुणे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाऱ्यांसमोर सपशेल घुडघे टेकल्याचं दिसून आलं आहे. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली, तर अख्खं जलसंपदा खातंच निलंबित करावं लागेल, मंत्र्यांनी सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत, आता कुणाकुणावर कारवाई करावी, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जवळ-जवळ सर्वच प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार असल्याची कबुली दिली आहे, मंत्री महोदयांच्या बोलण्यावरून जलसंपदा खाते संपूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरलं गेलं आहे.

मात्र त्यांची हतबलता आणखी पुढे दिसून येतेय की, कुणाकुणावर कारवाई करू, कुणा-कुणाला घरी पाठवू, मंत्र्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी सह्या केल्या आहेत, अशी पाठराखण गिरीश महाजन यांनी केलीय.

मंत्र्यांनी सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांनी सह्या केल्या, असं कारण अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारातून मुक्ती देण्यासाठी पुरेसं आहे का? हा सवाल देखिल उपस्थित केला जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.