परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचे अपहरण

परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणा-या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. यामागे इसिसचा हात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय.

Updated: Sep 8, 2015, 03:31 PM IST
परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचे अपहरण  title=

नाशिक : परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणा-या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. यामागे इसिसचा हात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय.

सरकारवाडा पोलिसांनी सिराज शेख या आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय. गौरव हा मुंबईत बड्या कंपनीत नोकरीला होता. मात्र त्याला कुवेतच्या कंपनीकडून जॉबची ऑफर असल्यानं तो नाशिकला परत आला. मात्र दुस-या दिवशी सकाळी नाशिकच्या घरातून बाहेर पडला तो माघारी आलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्याजवळ असलेल्या साहित्याची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत कंपनीचे ऑफर लेटर आणि कुवेतच्या कंपनीकडून त्याच्या बँक अकाऊंटमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्याचं आढळून आलं.

काही मुस्लिम धर्माशी संबंधित वस्तूही त्याच्या बॅगेत आढळून आल्या आहेत. त्यामुळं तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांचं ब्रेन वॉश करून इसिससारख्या संघटनेनंच अपहरण केल्याचा संशय गौरवच्या कुटुंबियांनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.