सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या चारशे शाळकरी मुलांना विषबाधा झालीय. शाळेतला भात खाल्ल्यानं, विद्यार्ध्यांना विषबाधा झाली. करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावातली ही घटना घडलीय.
कोर्टी गावातल्या श्री छ्रत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये मध्यान्ह भोजणाच्या वेळी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे भात दिला गेला होता. या भातामध्ये रॉकेलचा वास येत होता... पण, मुलांनी तो तसाच खाल्ला, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. यानंतर, काही वेळातच मुलांना चक्कर येणं, उलट्या होणं असा त्रास सुरू झाला... त्यामुळे त्यांना करमाळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. इथं अडीचशे विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
शाळेतील अन्न पदार्थांचे नमुने प्रशासनानं गोळा केलेत. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.