सातारा : सातारा पाली यात्रेच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आलीय. हत्ती बिथरल्याने यात्रेत गोंधळ उडाला आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले.
सध्या पालीमध्ये खंडोबाची यात्रा सुरू आहे... यात्रेचा पहिला दिवस म्हणजे खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या विवाहाचा सोहळा... या सोहळ्यासाठी इथं लाखो भाविकांनी गर्दी केली होती...
या यात्रेनिमित्तानं एक मिरवणूक आयोजित करण्यात आली होती... एका हत्तीवरून ही मिरवणूक सुरू होती... या मिरवणुकीदरम्यान विस्तवावर पाय पडून हत्ती बिथरला... आणि तो इकडे तिकडे धावू लागला. त्यामुळे, आजुबाजुला गर्दी केलेल्या भाविकांचा एकच गोंधळ उडाला... पळापळी झाली... चेंगराचेंगरी झाली... तुडवातुडवी झाली... आणि यादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.