बी-बियाणे घेताना जुन्या नोटा कधी स्वीकारणार?

शेतकऱ्यांना नवीन नोटा बदलताना होणारा त्रास पाहता बी-बियाणे घेताना जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी घोषणा सरकारनं केली. मात्र, हा निर्णय किरकोळ व्यापाऱ्यांना मिळालाच नसल्याच दिसून आलं. 

Updated: Nov 22, 2016, 11:02 PM IST
बी-बियाणे घेताना जुन्या नोटा कधी स्वीकारणार? title=

औरंगाबाद : शेतकऱ्यांना नवीन नोटा बदलताना होणारा त्रास पाहता बी-बियाणे घेताना जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी घोषणा सरकारनं केली. मात्र, हा निर्णय किरकोळ व्यापाऱ्यांना मिळालाच नसल्याच दिसून आलं. 

औरंगाबादमधील खत-बियाणांच्या व्यापाऱ्यांना कुठल्याच सूचना न मिळाल्यानं व्यापारी शेतकऱ्यांकडून जुन्या नोटा स्वीकारत नसल्याचं दिसून आलं. सरकारनं घोषणा केल्यावर शेतकरी मोंढा भागात खत दुकानात आले. 

मात्र, व्यापारी जुन्या नोटा स्वीकारत नसल्याचा अनुभव आल्यानं आता खत-बियाणं घ्यावं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. आम्हाला जर तसं पत्र प्राप्त झालं तर आम्हीही नोटा स्वीकारू असं दुकानदारांनी स्पष्ट केलंय.