शहरातल्या कळकट मळकट भिंतींना नवा लूक

शहरातल्या कळकट मळकट भिंतींना नवा लूक मिळावा आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भिंती रंगवा, ठाणे सजवा ही अभिनव संकल्पना राबवण्याची घोषणा केलीय. 

Updated: Nov 22, 2016, 10:56 PM IST
शहरातल्या कळकट मळकट भिंतींना नवा लूक title=

ठाणे : शहरातल्या कळकट मळकट भिंतींना नवा लूक मिळावा आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भिंती रंगवा, ठाणे सजवा ही अभिनव संकल्पना राबवण्याची घोषणा केलीय. 

या उपक्रमात शहरातल्या 55 हजार चौरस फुटांच्या भिंती रंगवण्यात येणार आहेत. या अभियानात शहरातले प्रथितयश चित्रकार सहभागी होतील. विद्यार्थी आणि नागरिकांनीही यात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. 

4 डिसेंबरपासून या उपक्रमाची सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कॅडबरी सर्व्हीस रोड, सिंघानिया शाळेची भिंत, नितीन जंक्शन उड्डाण पुलाचे खांब, आनंद दिघे प्रवेशद्वार, कोपरी सर्कल, कोपरी एसटी स्टँडजवळची भिंत, कळव्यातील एसटी कार्यशाळा आणि कौसा क्रीडा प्रेक्षागृह यांचा समावेश आहे.