अखिलेश हळवे, नागपूर : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानं महसूलमंत्री एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण खडसे नाराज नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
बहुजनाला नेतृत्व मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं विधान खडसेंनी पंढरपूरमध्ये केलं होतं. ओबीसी, बहुजनांनी भाजपला भरभरुन मतं दिल्याचंही त्यांनी म्हटलं.. त्यामुळं फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर तिस-याच दिवशी नाराजीनाट्य सुरु झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र एकनाथ खडसे नाराज नाहीत. मीडियाच्या प्रश्नांनुसार तुम्हाला तशी उत्तरं मिळतात मात्र याचा अर्थ ते नाराज आहेत असा नाही. असा दावा अर्थ. नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.