पिंपरी : ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळलीत.
संमेलनापूर्वी सबनीस यांच्या वक्तव्यांचा समाचार घेणारं रोखठोक खुलं पत्र 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी लिहिलं होतं. आपल्या समारोपाच्या भाषणात साहित्य शिरोमणी सबनीस यांनी त्याचाच उल्लेख करून, डॉ. उदय निरगुडकर आणि 'झी २४ तास'वर प्रतिहल्ला चढवलाय.
लोकशाहीचे दाखले देणाऱ्या सबनीसांना 'झी २४ तास'चा टीका करण्याचा अधिकार का मान्य नाही? असा सवाल आता उपस्थित होतोय. ते नेमकं काय म्हणालेत, ते पाहूयात...
याबाबत साहित्य जगत आता काय भूमिका घेतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.