घरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ

नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत. 

Updated: May 13, 2015, 11:42 AM IST
घरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ  title=

नागपूर : नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत. 

डॉ. आसमां शाहाब शरीफ... मृत्यूआधी सासरच्या मंडळींकडून झालेला छळ मृत्यूनंतरही थांबण्याचं नाव घेत नाहीए. लग्न अपयशी ठरल्यावर आलेल्या नैराश्यातून डॉ. आसमां शरीफ यांनी १३ मार्च २०१५ रोजी नागपूरच्या भालदारपूरा भागातल्या त्यांच्या माहेरच्या घरी स्वतःला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. माहेरच्या मंडळींनी त्यांना एअर अँब्युलन्सने मुंबईत ऐरोलीमधल्या बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेलं. मात्र, १८ मार्च २०१५ रोजी डॉ. आसमा यांचा मृत्यू झाला. 

मृत्यूपूर्वी नोंदवण्यात आलेल्या जबाबाबत आसामना यांनी पती डॉ. शाहाब शरीफ आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचे आरोप लावले आहेत. आसमा यांच्या जबाबानुसार सासरच्या मंडऴींनी त्यांचे दागिने हिसकावून घेतले होते. तसंच डॉक्टर पतीच्या नर्सिंग होमसाठी दोन कोटींची मागणी करत त्यांना सासरच्या घरी राहण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या आसमा यांनी १३ मार्च या दिवशी स्वतःला जाळून घेतलं. घटनेच्या दिवशी माहेरच्या कुटुंबियांनी प्रकरणाची माहिती गणेशपेठ पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी काहीचं केलं नाही, असं आसमाचे वडील हाजी असद खान यांचं म्हणणं आहे.  

आपल्या हद्दीत येत नाही - पोलिसांची टाळाटाळ
१८ मार्चला ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये आसमा यांचा मृत्यू झाला. अंत्यविधी पार पाडल्यावर २६ मार्चला आसमाच्या कुटुंबियांनी पुन्हा गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पण, पोलीस मात्र हद्दीचं कारण पुढे करत टाळाटाळ करत राहिले.

या प्रकरणाबाबत आम्ही आसमा यांच्या सासरच्या मंडळींशीही संपर्क साधला. मात्र, आमच्या वकिलांशी बोलूनच माध्यमांशी बोलायचं की नाही ते ठरवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. एखाद्या प्रकरणात पोलिसांचा हद्दीचा वाद नवा नाही. मात्र मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूनंतरही अपमान होईल अशा पद्धतीने प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं अजिबातच योग्य नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.