Navi Mumbai Accident: कामावरुन घरी परतणाऱ्या दोन तरुणींचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती खोकले आणि अंजली पांडे अशी दोन्ही तरुणींची नावे आहेत. दोघीही एका खासगी कंपनीत कामाला होत्या. कंपनीत नाइट शिफ्ट करुन त्या घरी परतात होत्या. दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यातच दोघींचा मृत्यू झाला.
कामोठयात राहणारी २२ वर्षीय संस्कृती खोकले आपली मैत्रीण १९ वार्षिय अंजली पांडे हीला बोनाकोड्यातील घरी सोडण्यासाठी जात होती. कोपरी पुला खालील सर्विस रोड वरून बोनकोड्यात जात असताना स्कोडा गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, त्यातच दोघींचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दुचाकीवरुन जात आलेल्या मुलींनी राँग साईटने आल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटंल आहे. एपीएमसी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
सोयगावात काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका आठ वर्षीय बालकाला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाहन चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोयगावातील नागरिक मुख्य रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी करत होते. विशेषतः या भागातील अनेक गल्ल्या मुख्य रस्त्याला काटकोनात मिळत असल्याने, प्रत्येक गल्लीजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सुरुवातीला काही ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आले होते. परंतु प्रशासनाने नंतर ते काढून टाकले. या हलगर्जीपणामुळेच वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.