तीन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून पोत्यात भरलं

पिंपरी चिंचवड मधल्या चिखली जाधववाडी परिसरातून तीन वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आलीय.

Updated: May 13, 2015, 10:13 AM IST
तीन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून पोत्यात भरलं title=

पुणे : पिंपरी चिंचवड मधल्या चिखली जाधववाडी परिसरातून तीन वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आलीय.

अर्पिता सिंग अस या मुलीचं नाव आहे. ती रविवार दुपारपासून बेपत्ता होती.  या घटनेनं शहरात एकच खळबळ उडालीय. 

अर्पिता रविवारी नेहमीप्रमाणं तिच्या घरासमोर खेळत होती. बराच वेळ झाला अर्पिता घरी आली नाही म्हणून तीच्या आईनं बाहेर येऊन चौकशी केली... पण ती सापडली नाही. बराच शोध घेतल्या नंतरही ती आढळून आली नाही. 

अखेर मंगळवारी अर्पिताचा मृतदेह तिच्या घराच्या मागच्या बाजूला एका गोडाऊन मध्ये आढळून आला. मुलीची हत्या करून तीचा मृतदेह एका पोत्यात टाकून ड्रममध्ये लपवण्यात आला होता. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.